पोलिओ निर्मूलनासाठी बाईक रॅलीने जागृती
रोटरी बेळगाव परिवाराचा उपक्रम
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी बेळगाव परिवाराच्यावतीने शनिवारी पोलिओ निर्मूलनासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिओ लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करून नागरिकांमध्ये पोलिओ निर्मूलनासाठीची जागृती करण्यात आली.
बेळगावच्या सीपीएड मैदानापासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून बाईक रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये इनरव्हील क्लब, बिम्स हॉस्पिटल तसेच इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
पोलिओचा एखादा डोस जरी चुकला तर व्यक्ती कायमस्वरुपी दिव्यांग होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पोलिओचा डोस आठवणीने द्या, असे नागरिकांना सांगण्यात आले. शहराच्या विविध भागातून ही बाईक रॅली फिरली. यावेळी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, व्यंकटेश देशपांडे, प्रांतपाल अशोक नाईक यासह इतर उपस्थित होते.
