For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदान जागृतीसाठी ता.पं.तर्फे बाईक रॅली

10:27 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदान जागृतीसाठी ता पं तर्फे बाईक रॅली
Advertisement

मतदारांना केले आवाहन, टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

Advertisement

बेळगाव : मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही बळकट क्हावी यासाठी तालुका पंचायततर्फे सोमवारी बाईक रॅली काढण्यात आली. हिंडलगा येथून तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बाईक रॅलीला चालना देण्यात आली. हिंडलगा, सुळगा, उचगाव आणि बेकिनकेरे गावात काढण्यात आलेल्या या रॅलीला प्रतिसाद मिळाला. तालुका पंचायतीतर्फे मतदान जागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान या बाईक रॅलीद्वारे मतदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. तालुका पंचायतीतर्फे 57 ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात महिनाभर मतदान जागृतीचे काम सुरू आहे. रांगोळी स्पर्धा, सायकल फेरी, बाईक रॅली, कॅन्डल मार्च आदी उपक्रम राबविले जात आहेत.

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कसली कंबर

Advertisement

निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. त्याबरोबर तालुका पंचायतीने देखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत कार्यक्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून मतदारांना जागृत केले जाणार आहे.

आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

त्याबरोबर पथनाट्या सादर करून जागृती होणार आहे. सोमवारी हिंडलगा, उचगाव, सुळगा आणि बेकिनकेरे गावातील गल्लोगल्ली बाईक रॅली काढून मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या बाईक रॅलीमध्ये योजना अधिकारी गंगाधर दिवटकर, ता. पं. चे गणेश के. एस., बसवंत कडेमनी, व्यवस्थापक राजेंद्र मोरबद, महेश बजंत्री यांच्यासह कर्मचारी, पीडीओ, ग्रंथपाल, ग्राम पंचायत सदस्य सहभागी होते.

Advertisement
Tags :

.