कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुचाकी अपघातात पादचारी वृद्धाचा मृत्यू, मुरादपूर येथील घटना

11:00 AM Apr 27, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

दुचाकीस्वारावर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला

Advertisement

देवरुख : देवरुख-मार्लेश्वर मार्गावरील मुरादपूर येथे दुचाकीस्वाराने येथीलच पादचारी वृद्धाला धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 22 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. आत्माराम भागोजी गोंधळी (64, रा. मुरादपूर वरचीवाडी) असे अपघातातील मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी मुरलीधर श्रीधर खेडेकर (33, रा. मुरादपूर वरचीवाडी) या दुचाकीस्वारावर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची खबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे यांनी दिली. मुरलीधर खेडेकर हा दुचाकी (एमएच-09, डीपी- 7002) घेवून 22 रोजी मार्लेश्वर ते देवरुखच्या दिशेने येत होता. मुरलीधर याने बेदरकारपणे दुचाकी चालवून देवरुखहून मुरादपूरच्या दिशेने चालत येणाऱ्या आत्माराम गोंधळी यांना धडक दिली.

अपघातात गोंधळी यांच्या डोक्याला, हाताला, पायाला दुखापत झाली होती. तत्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रूग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी गोंधळी यांना कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान गोंधळी यांचा मृत्यू झाला. गोंधळी यांचा मृतदेह मुरादपूर येथील निवासस्थानी आणण्यात आला.

येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात गोंधळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वत:च्या दुखापतीस, वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुरलीधर खेडेकर याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 106 (1), 125(), 125(), 281, मोटार वाहन कायदा कलम 184, 146/196 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :
@accident#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediadevrukhkonkan news
Next Article