महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

11:00 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज सूर्योदयाला देवीचा विवाह सोहळा : रथोत्सव मिरवणूक : सायंकाळी गदगेवर विराजमान

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांच्या महालक्ष्मीदेवी यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी बिजगर्णी गावातील सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा करून यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली. देवांची पूजा करताना पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. तब्बल तीस वर्षांनंतर या गावांची लक्ष्मीदेवी यात्रा भरविण्यात आली असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पै-पाहुणे, मित्रमंडळी गावांमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी दुपारी कलमेश्वर मंदिर येथे सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातील महिला, यात्रा कमिटीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. बिजगर्णी यात्रेसाठी अगसगे येथून रथ आणण्यात आला आहे. गावात रथ जोडणीचे काम पंधरा दिवसांपासून सुरू होते. हा रथ कलमेश्वर मंदिराजवळ ठेवण्यात आला आहे.

प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात आली आहे. शाळेच्या आवारात सुवर्णमंडपाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंडपात देवी विराजमान होणार आहे. मंगळवारी सायंकाळी विधिवत पूजा करून देवीचा हळदी सोहळा झाला.बुधवार दि. 17 रोजी सूर्योदयाला देवीचा विवाह होणार आहे. त्यानंतर देवीची रथातून गावभर मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीची गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी मराठी शाळेजवळील सभा मंडपात देवी गदगेवर विराजमान होणार आहे. त्यानंतर गावच्यावतीने देवीची ओटी भरण्यात येणार आहे. नऊ दिवस ही यात्रा होणार असून यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पडल्या भरण्याच्या कार्यक्रमप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा.पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, नामदेव मोरे, चांगदेव जाधव आदींसह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिजगर्णी-कावळेवाडी यात्रेसाठी विशेष बस

यात्रा काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राकसकोप, बिजगर्णी आणि कावळेवाडी गावांना जादा बसची सोय करण्यात आली आहे. मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानकात ही विशेष बस उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी 8 पासून रात्री उशीरापर्यंत ही बससेवा धावणार आहे. तालुक्यातील राकसकोप, बिजगर्णी आणि कावळेवाडी गावच्या महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. या दरम्यान प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. याकरिता बिजगर्णी आणि कावळेवाडी मार्गावर जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडल्या जाणार आहेत. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशी बसला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यात्रा काळाकरिता अतिरिक्त बससेवा पुरविली जाणार आहे, अशी माहितीही परिवहनने दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article