बिहारचा उत्तरप्रदेशला धक्का
वृत्तसंस्था /कोलकाता
2025 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या ब गटातील सामन्यात बिहारने उत्तरप्रदेशला 6 गड्यांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात बिहारचा फलंदाज रिंकू सिंग अधिक धावा जमवू शकला नाही. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात महाराष्ट्राने गोव्याचा 15 धावांनी पराभव केला. अन्य एका सामन्यात चंदीगडने हैदराबादवर 4 गड्यांनी विजय मिळविला.
उत्तरप्रदेश आणि बिहार यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तरप्रदेशने 20 षटकांत 6 बाद 144 धावा जमविल्या. प्रशांत वीरने नाबाद 40 धावा जमविल्या. बिहारच्या मंगल महारोरने 12 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर बिहारने 19.2 षटकांत 4 बाद 145 धावा जमवित विजय नोंदविला. सलामीचा फलंदाज पीयूष सिंगने 54 चेंडूत 57 धावांची खेळी केली. उत्तरप्रदेशच्या प्रिन्स यादवने 24 धावांत 3 गडी बाद केले.
महाराष्ट्र विजयी
महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रने 20 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या. त्यानंतर गोव्याचा डाव 19.3 षटकांत 146 धावांत आटोपला. महाराष्ट्राच्या डावामध्ये राहुल त्रिपाठीने 83 धावांची खेळी केली. गोवा संघातर्फे व्ही. कौशिकने 20 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर गोव्याचा डाव 19.3 षटकांत 146 धावांत आटोपला. ललित यादवने 49 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे सक्सेना, संघवी आणि ओसवाल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
चंदीगड आणि हैदराबाद यांच्यातील सामना प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 8 बाद 146 धावा जमविल्या. पी. रे•ाrने 43 धावा केल्या. तर चंदीगडतर्फे जगदीश सिंगने 3 आणि धिंडसाने 2 तसेच संदीप शर्माने 2 बळी मिळविले. त्यानंतर चंदीगडने 19.5 षटकांत 6 बाद 147 धावा जमवित हा सामना 1 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी जिंकला. चंदीगडच्या डावात अर्जुन आझादने 63 तर शिवम भांब्रीने 42 धावा केल्या. रक्षण रे•ाr आणि मिलिंद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश 20 षटकांत 6 बाद 144 (प्रशांत वीर नाबाद 40, महारोर 3-12), बिहार 19.2 षटकांत 4 बाद 145 (पीयूष सिंग 57, प्रिन्स यादव 3-24).
महाराष्ट्र 20 षटकांत 7 बाद 161 (राहुल त्रिपाठी 83, व्ही. कौशिक 3-20), गोवा 19.3 षटकांत सर्वबाद 146 (ललित यादव 49, सक्सेना, संघवी, ओसवाल प्रत्येकी 3 बळी).
हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 146 (पी. रे•ाr 43, जगजित सिंग 3-36, धिंडसा 2-18, संदीप शर्मा 2-33), चंदीगड 19.5 षटकांत 6 बाद 147 (अर्जुन आझाद 63, शिवम भांब्री 42, सी. रे•ाr व मिलिंद प्रत्येकी 2 बळी).