For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारचा 3 लाख 47 हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर

06:10 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहारचा 3 लाख 47 हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर
Advertisement

पटणा

Advertisement

देशाच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर बिहार राज्याने आपला आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. 3 लाख 47 हजार 589 लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असणार आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 10 टक्के अधिक तरतूद करण्यात आली आहे.

बिहार सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अर्थमंत्री बिजेंद्र यादव यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. 12 मिनीटांच्या भाषणामध्ये राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला. या दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध सदस्यांनी आरोप प्रत्यारोप करत भाषणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पामध्ये विकासासोबतच पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला राज्याने सर्वेच्च प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

खास करून युवक, शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागांचा विचार करून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ग्रामीण भागामधील संपर्क व्यवस्था चांगली करण्यासाठी नव्या रस्ते महामार्गाची योजना ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबविण्यात येणार असून महिलांना या अंतर्गत 2 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचसोबत 125 युनिट मोफत वीज सर्वांना देण्याबाबतची घोषणा करण्यात आली असून एक कोटी रोजगार प्राप्त करून देण्याचे ध्येय अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी 60205 कोटी खर्च करण्यात येणार असल्याचेही बिजेंद्र यादव यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.

Advertisement

.