बिहार ः दारुबळींचा आकडा 40 च्या वर
06:19 AM Dec 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पटना / वृत्तसंस्था
Advertisement
बिहारमधील छपरा येथे विषारी दारुमुळे मृत झालेल्यांचा आकडा आतापर्यंत 40 च्या वर पोहोचला आहे. तसेच 30 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता आहे. छपरा येथील मशरक भागात ही घटना घडली असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राज्यात दारुबंदी असतानाही ही घटना घडल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपही जोरात सुरू आहेत.
Advertisement
सारन तसेच छपरा जिल्हय़ात विषारी दारु सेवनाने बळी घेतले आहेत. तर अनेकांची विषारी दारुच्या प्राशनामुळे प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व लोकांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. संबंधित मद्यपींची प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Advertisement
Next Article