For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहार मंत्रिमंडळाचा आज विस्तार

06:54 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहार मंत्रिमंडळाचा आज विस्तार
Advertisement

नितीश कुमार पुत्र निशांत यांचा समावेश शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज गुरुवारी होणार आहे. या विस्तारात माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पक्ष (पास्वान) आणि दोन छोटे पक्ष यांच्या काही प्रतिनिधींचा समावेश विस्तारात करण्यात येईल, अशी माहिती बुधवारी रात्री सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बुधवारी रात्रीच पाटणा येथे आगमन झाले आहे. नव्या मंत्र्यांना लोकभवनात राज्यपाल निवृत्त ले. ज. सैय्यद अता हसनैन यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही उपस्थिती लाभेल अशी शक्यता आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व सदस्य पक्ष यांचे बिहारमधील महत्वाचे नेतेही उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. कोणत्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल, हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. शपथविधी कार्यक्रमाच्या आधी काही काळ ही सूची प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांना समान संख्या मिळणे शक्य आहे. मुख्यमंत्री या विस्तारात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे सम्राट चौधरी यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाला प्रथमच या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली आहे.

बहुमतानंतर नितीश कुमार यांचा पदत्याग

काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मोठा विजय झाला. आघाडीला विधानसभेच्या एकंदर 243 जगांपैकी 202 जागा मिळाल्या. नितीश कुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यानंतर काही काळातच त्यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर निवड करण्यात आली. त्यांनतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांची रालोआच्या सर्व घटकपक्षांच्या सहमतीने मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाला हे पद मिळाले आहे.

Advertisement
Tags :

.