For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिगोसची ईव्ही स्कूटर ‘ऊवाह’ लाँच

07:00 AM Aug 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिगोसची ईव्ही स्कूटर ‘ऊवाह’ लाँच
Advertisement

पूर्ण चार्जवर 145 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा : शहरासारख्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी राहणार उपयुक्त

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक बिगोसने भारतात ‘ऊवाह’ ही इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनी याला देशातील पहिली ‘ईव्ही पॉप’ स्कूटर म्हणत आहे. 145 किलोमीटरची रेंज आणि पोर्टेबल काढता येण्याजोगी बॅटरी हे तिचे वैशिष्ट्या आहे. ही स्कूटर शहरात दररोज प्रवास करणाऱ्या तरुणांना, विशेषत: जेन-झी  आणि पहिल्यांदा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. या ईव्हीची किंमत चार्जरसह एक्स-शोरूम 1,22,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

Advertisement

काढता येण्याजोगी बॅटरी, 145 किमी रेंज

बिगोस ‘ऊवाह’मध्ये कॅन-इनेबल्ड 3.0 केडब्लूएच लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी पॅक आहे. काढता येण्याजोगी बॅटरी हे तिचे वैशिष्ट्या आहे. ती घरात किंवा अपार्टमेंटमध्ये चार्ज केली जाऊ शकते. ज्यांच्याकडे पार्किंगमध्ये चार्जिंग पॉईंट नाही, त्यांच्यासाठी ही सोयीस्कर आहे. ही स्कूटर एका चार्जवर 145 किलोमीटरची एआरएआय-प्रमाणित रेंज देते. चार आकर्षक रंगात ही गाडी आली आहे. डिझाइनच्या बाबतीत, कंपनीने याला बोल्ड ग्राफिक्स आणि एक आकर्षक स्टायलिंग थीम दिली आहे, जी आजच्या जेन झी ला आकर्षित करते. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर रोजच्या प्रवासाची स्टाईल आणि उपयुक्तता दोन्ही जपते.

रिव्हर्स असिस्ट फंक्शन : अरुंद पार्किंगच्या जागेत स्कूटर रिव्हर्स घेण्यास मदत करते.

डिस्टन्स-टू-एम्प्टी इंडिकेटर : हा डिस्प्ले स्कूटर उर्वरित बॅटरीवर आणखी किती किलोमीटर धावेल याची रिअल-टाइम माहिती देतो.

सुरक्षितता आणि सोय : यामध्ये साईड स्टँड सेन्सर, मोबाईल चार्जिंगसाठी ळएँ चार्जिंग पोर्ट, पूर्ण एलइडी लायटिंग सेटअप आणि सामानासाठी सीटखाली मोठी स्टोरेज जागा आहे.

ईव्ही दुचाकी बाजारपेठ मजबूत

देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी विक्रमी पातळीवर असताना बिगोसने ही नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, 2026 च्या पहिल्या 7 महिन्यांत भारतात 11.1 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर, मासिक दुचाकी बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्सचा वाटा पहिल्यांदाच 11 टक्के आकडा ओलांडून गेला आहे.

Advertisement
Tags :

.