For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत अ महिला संघाचा मोठा विजय

06:40 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अ महिला संघाचा मोठा विजय
Advertisement

ऑस्ट्रेलिया अ 281 धावांनी पराभूत : निकी प्रसाद सामनावीर

Advertisement

येथे शुक्रवारी झालेल्या एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात यजमान भारत अ महिला संघाने ऑस्ट्रेलिया अ महिला संघाचा 281 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात फलंदाजीत 91 धावा तर गोलंदाजीत 7 बळी घेणारी भारत अ महिला संघातील निक्की प्रसादला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात भारत अ महिला संघाने पहिल्या डावात 364 धावा जमविल्या. निक्की प्रसादने 91 तर तनिशा सिंगने 92, शुभा सतीशने 59, प्रिया पुनियाने 46 तर अनुष्का शर्माने 44 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातर्फे मिल्सने 4 तर नॉटने 3 गडी बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाचा पहिला डाव 176 धावांत आटोपला. भारत अ महिला संघाने पहिल्या डावात 188 धावांची आघाडी मिळविली. वैष्णवी शर्माने 52 धावांत 6 तर सुची उपाध्याय आणि निक्की प्रसाद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारत अ महिला संघाने दुसऱ्या डावात 257 धावा जमवित ऑस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी 446 धावांचे आव्हान दिले. भारत अ संघाच्या दुसऱ्या डावात पुनियाने 9 चौकारांसह 59, कर्णधार यास्तिका भाटियाने 8 चौकारांसह 46, अनुष्का शर्माने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 48, शुभा सतीशने 3 चौकारांसह 27 आणि वैष्णवी शर्माने 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ तर्फे मिल्सने 5 तर निकलीनने 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया अ संघाचा दुसरा डाव 76 षटकात 164 धावांत आटोपला. फ्लिन्टॉफने 9 चौकारांसह 58, मिल्सने 4 चौकारांसह 32, कर्णधार ट्रिनेमनने 5 चौकारांसह 26 आणि विल्सनने 6 चौकारांसह 28 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे निकी प्रसादने 50 धावांत 5 तर वैष्णवी शर्माने 58 धावांत 3 गडी बाद केले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - भारत अ प. डाव 364, ऑस्ट्रेलिया अ प. डाव 176, भारत अ दु. डाव 257, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव सर्वबाद 164 (निक्की प्रसाद 5-50, वैष्णवी शर्मा 3-58).

Advertisement
Tags :

.