For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूचा रेल्वेवर मोठा विजय

06:37 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूचा रेल्वेवर मोठा विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ कोईमत्तूर

Advertisement

कर्णधार साईकिशोरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 2024 च्या रणजी करंडक इलाईट क गटातील येथे झालेल्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर तामिळनाडूने रेल्वेचा एक डाव आणि 129 धावांनी दणदणीत पराभव केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने पहिल्या डावात 489 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर रेल्वेचा पहिला डाव 246 धावात आटोपल्याने तामिळनाडूने त्यांना फॉलोऑफ दिला. रेल्वेने दुसऱ्या डावात केवळ 114 धावा जमविल्याने त्यांना हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला. तामिळनाडूचा कर्णधार साईकिशोरने या सामन्यात 7 गडी बाद केले आहेत.

Advertisement

कर्नाटक सुस्थितीत

म्हैसूरमध्ये सुरू असलेल्या 2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकाने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात गोवा संघाचा पहिला डाव 321 धावावर आटोपल्यानंतर कर्नाटकाने आपला पहिला डाव 9 बाद 498 धावांवर घोषित करुन 177 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर गोवा संघाने रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 93 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या पहिल्या डावात मयांक अगरवाल, देवदत्त पडीकल आणि निकिन जोश यांनी शानदार शतके झळकवली. गोवा संघातील दर्शन मिसाळने 134 धावात 6 गडी बाद केले. क गटातील अन्य दोन सामने चंदीगड आणि गुजरात तसेच पंजाब आणि त्रिपुरा यांच्यात खेळविले गेले. पण रविवारी अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबविण्याचा निर्णय घेतला.

संक्षिप्त धावफलक - तामिळनाडू प. डाव 489, रेल्वे प. डाव 286, दु. डाव 114 (पी. सिंग 29, साईकिशोर 4-43, अजितराम 4-40).

गोवा प. डाव 321, कर्नाटक प. डाव 9 बाद 498, गोवा दु. डाव 1 बाद 93.

गुजरात प. डाव 2 बाद 86 वि. चंदिड

पंजाब प. डाव 7 बाद 78, त्रिपुरा.

Advertisement
Tags :

.