For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईचा बंगालवर डावाने मोठा विजय

06:08 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईचा बंगालवर डावाने मोठा विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2024 च्या रणजी हंगामातील रविवारी येथे झालेल्या ब गटातील इलाईट सामन्यात मोहित अवस्थीच्या अचुक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने यजमान बंगालचा एक डाव 4 धावांनी दणदणीत पराभव करत बोनस गुणासह 7 गुण वसुल केले. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 412 धावा झळकविल्या. त्यानंतर बंगालचा पहिला डाव 199 धावात आटोपला. मुंबईकडून बंगालला फॉलोऑन स्वीकारावा लागला. बंगालचा दुसरा डाव 59.4 षटकात 209 धावात आटोपला. मुंबई संघातील मोहित अवस्थीने 52 धावात 7 गडी बाद केले. बंगालतर्फे अभिषेक पोरलने एकाकी लढत देत 82 धावा झळकाविल्या. या सामन्यात अवस्थीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या सामन्यात 10 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 412, बंगाल प. डाव 199, बंगाल दु. डाव सर्व बाद 209 (अभिषेक पोरेल 82, मोहित अवस्थी 7-52).

Advertisement

Advertisement
Tags :

.