For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : मिरज ग्रामीण पोलिसांचे मोठे यश; आंतरराज्य ट्रॅक्टर चोरी टोळीचा पर्दाफाश

04:12 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
sangli   मिरज ग्रामीण पोलिसांचे मोठे यश  आंतरराज्य ट्रॅक्टर चोरी टोळीचा पर्दाफाश
Advertisement

                            शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत;

Advertisement

सोनी : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरी करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपासाद्वारे ११ लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि तीन ब्लोअर हस्तगत केले असून, याप्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी नंदकुमार चौगुले (रा. भोसे, ता. मिरज) आणि बसवराज हिप्परगी (रा. बेडरहट्टी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव व
त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. भोसे येथील नंद‌कुमार चौगुले याने खरशिंगे मळा येथील हराळे यांच्या शेतातून ट्रॅक्टर व ब्लोअर चोरून त्याची विक्री केल्याचे समजले. पोलिसांनी दंडोबा डोंगराजवळ सापळा रचून नंदकुमारला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने मित्र बसवराज हिप्परगी याच्या मदतीने २०२४ आणि २०२५ मध्ये एकूण तीन ट्रॅक्टर व ब्लोअर चोरल्याची कबुली दिली.

Advertisement

यावेळी दोन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ८० हजार रुपये किमतीची ब्लोअर, दोन लाख ७० हजार रुपये किमतीचा 'कुबोटा' ट्रॅक्टर ५० हजार रुपये किमतीचा औषध फवारणी ब्लोअर चार लाख रुपये किमतीचा 'कुबोटा २१ एचपी' ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

Advertisement
Tags :

.