For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 4 नक्षलवादी ठार

06:46 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश  4 नक्षलवादी ठार
Advertisement

बिजापूर येथे झाली चकमक

Advertisement

वृत्तसंस्था/ बिजापूर

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली आहे. नक्षलवादविरोधी मोहिमेच्या अंतर्गत जंगला पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या जंगलांमध्ये डीआरजी आणि सीआरपीएफ जवानांच्या गस्तीदरम्यान ही चकमक झाली आहे. या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement

डीआरजीचे गस्तपथक तुंगाली जंगलानजीक असताना गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत चकमक स्थळावरून 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून शोधमोहीम अद्याप जारी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. संबंधित ठिकाणी सुमारे 40-50 नक्षलवादी दबा धरून बसले होते, त्यांच्यात नक्षली कमांडरचाही समावेश होता. यापूर्वी कांकेर जिल्ह्dयात रविवारी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठा वेग मिळाला आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागांमध्ये सुरक्षा दलांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. छत्तीसगडच्या जंगलांमध्ये लपून बसणारे नक्षलवादी आता अन्य राज्यांमध्ये जाण्याची शक्यता पाहता विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Advertisement
Tags :

.