For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा पोलीस दलात मोठी खळबळ! एसपी तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे विधान परिषदेचे आदेश

03:14 PM Mar 23, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा पोलीस दलात मोठी खळबळ  एसपी तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे विधान परिषदेचे आदेश
Advertisement

                   पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की प्रकरण भोवले;

Advertisement

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री साताऱ्याचे पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मतदारांना रोखल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेत घेण्यात आली असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सातारा पोलीस प्रशासनावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक देवकर, साहाय्यक निरीक्षक गरजे यांच्यासह धक्काबुक्कीमध्ये सहभागी असलेल्या सुमारे शंभर पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान भाजपच्या विजयानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात हा राडा घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी अरेरावीची भाषा वापरली, तसेच त्यांना धक्काबुक्की करत दुखापत केल्याचा गंभीर आरोप आहे. याचवेळी काही मतदारांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवल्याचेही आरोप करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा यांना पोलिसांकडून झालेल्या वर्तणुकीचा मुद्दा विधान परिषदेत जोरदारपणे उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलीस प्रशासनावर कारवाईचे आदेश देण्यात आल्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणखी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे संकेतही प्रशासनाच्या स्तरावरून मिळत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या या प्रकारामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Tags :

.