गायक 'दिलजीतसिंग दोसांझ'चं मोठं विधान
आता भारतात लाईव्ह कॉन्सर्ट करणार नाही
पंजाबी गायक 'दिलजीतसिंग दोसांझ'ला भारतातच काय संपूर्ण जगभरातील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. दिलजीतसिंग दोसांझ हा त्याच्या गायनाने तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचा शनिवारी चंदीगढमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडली. या लाईव्ह क़ॉन्सर्टला तरुणाई अगदी मंत्रमुग्ध झाली.
या कार्यक्रमात दिलजीतने तो अनेक देशांत कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर चालला असल्याचेही सांगितले. याचवेळी त्याने मोठे विधान केले. दिलजीत म्हणाला, आता या पुढे भारतात लाईव्ह कॉन्सर्ट करणार नाही. जोपर्यंत भारतातील कान्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल होत नाही तो पर्यंत भारतात कॉन्सर्ट करणार नाही, असे बोलून त्याने निराशा व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, भारतात लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हा पण एक कमाईचा मार्ग आहे. अशा कार्यक्रमांवर अनेकांची रोजीरोटी अवलंबून असते. कृपया यावर लक्ष केंद्रीत करा.
दिलजीतच्या या वाक्यानंतर कार्यक्रमात एकच चर्चा सुरु झाली. त्याच्या या निर्णयावर अनेक चाहत्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत.