For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोठा धक्का! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; खा. ओमराजे हायकोर्टात जाणार

10:29 AM Jun 22, 2026 IST | NEETA POTDAR
मोठा धक्का  पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष  खा  ओमराजे हायकोर्टात जाणार
Advertisement

Advertisement

मुंबई - गेल्या बरेच दिवसांपासुन विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर सध्या दोन अत्यंत महत्त्वाच्या कारणांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चेत आले आहेत.एकीकडे दोन दशकांपेक्षा अधिक काळ चाललेल्या त्यांच्या वडिलांच्या, म्हणजेच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, ज्यामुळे निंबाळकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील खासदारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चांमध्ये त्यांचे नाव जोडले जात असल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पवनराजे निंबाळकर केसचा निकाल 

Advertisement

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये 21 जुन रोजी निकाल झाला. कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी निर्दाेष मुक्तता केली. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. तब्बल 20 वर्षांनी हा निकाल देण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. या निकालावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे... ते म्हणाले
हा निकाल दुर्देवी आहे. कारण मागच्या 20 वर्षापासून अखंडपणे आरोपींना शासन व्हावे, शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करत होतो. तपास यंत्रणांसोबतच आम्ही प्रयत्न करत होतो. दुर्देवाने जो निकाल आहे, त्या निकालाला आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयाकडून आता न्यायाची अपेक्षा आहे. असं मत त्यांनी व्यक्त केले..

पक्षांतराच्या चर्चांवर सोडले मौन

दुसरीकडे गेले बऱ्याच दिवसांपासुन ऑपरेशन टायगर चर्चेत आहे... ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत ज्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती... ओमराजे निंबाळकर ठाकरेंवर नाराज असल्याचे बोललं जात होत... त्यामुळे उध्दव ठाकरे हे ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या यावर निंबाळकर यांनी प्रतिक्रीया दिली .. ते म्हणाले मी कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आणि त्यानंतरच पुढील भूमिका जाहीर करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.