For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vedant Bandgar Murder Case | वेदांत बंडगर हत्याकांडात मोठा खुलासा; बंडगर यांच्यावर गोळीबार करण्यासाठीच रचला होता कट!

12:32 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
vedant bandgar murder case   वेदांत बंडगर हत्याकांडात मोठा खुलासा  बंडगर यांच्यावर गोळीबार करण्यासाठीच रचला होता कट
Advertisement

सांगली : वेदांतबंडगर हत्याकांडाच्या तपासात पोलिसांच्या हाती मोठे यश लागले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. यातील एका पिस्तुलातूनच वेदांतवर गोळीबार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या हत्याकांडातील पसार संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले यांच्यासह अन्य साथीदारांचाशोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे.

Advertisement

मिरज तालुक्यातील रेल्वे मालधक्का कामाच्या वादातून पेटलेल्या संघर्षाने अखेर निष्पाप वेदांतचा बळी घेतल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. रेल्वे मालधक्क्याचे काम सोडण्यासाठी लक्ष्मण खरात यांच्यावर दबाव टाकणाऱ्या गडदेने १० जून रोजी खरात यांच्या घरी जाऊन धमकी देत खंडणीची मागणी केली होती. या घटनेनंतर जतमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्यावाहनांवर दगडफेक केल्याने गडदे चांगलाच संतापला होता. याच रागातून गडदेने हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांना लक्ष्य करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. मात्र, सांगलीत पोहोचल्यावर अंगणात मोबाईल पाहत बसलेल्या वेदांत बंडगरवर गोळी झाडण्यात आली.

या गोळीबारात वेदांतचा जागीच मृत्यू झाला आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. घटनेनंतर फरार गडदेच्या झालेल्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार यश आले. पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीतून दोन गावठी पिस्तुलांचा तपास लागला असून ती कुठून आणली, कोणाकडून मिळवली आणि कटात आणखी कोण सहभागी होते याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे. पसार सागर चौगुलेची आत्महत्येची धडपड या प्रकरणातील आणखी एक संशयित सागर उर्फ नानासो चौगुले याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.