For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Delhi Protest | संसदेसमोर मोठा राडा! आंदोलकांवर लाठीचार्ज, आमदाराला बॅरिकेडवर फेकल्याचा आरोप

10:20 AM Jul 21, 2026 IST | NEETA POTDAR
delhi protest   संसदेसमोर मोठा राडा  आंदोलकांवर लाठीचार्ज  आमदाराला बॅरिकेडवर फेकल्याचा आरोप
Advertisement

दिल्ली -दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे.. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाचा आज 32 वा दिवस आहे. 20 जून रोजी आंदोलकांनी थेट संसदेवर धडकण्याचा इशारा दिला होता.त्या नुसार , देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे जथेच्या जथे दिल्लीत दाखल होत होते. यापैकीच आंदोलकांचा एक मोठा गट पोलिसांची नजर चुकवून थेट संसद भवनाच्या परिसरात पोहोचला. यामुळे संसदेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना लाटीचार्ज देखील करावा लागला,पोलिसांना अमानुषपणे केलेल्या लाटीचार्जचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

Advertisement

पोलिसांचा या अमानुषपणाच्या वागण्याला आमदारांना सुध्दा सामोरे जावे लागले, मोर्चामध्ये सहभागी झालेले आम आदमी पक्षाचे तीन वेळेचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना पोलिसांनी उचलून थेट बॅरिकेट्सवर फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे.हा मोर्चा संसदेकडे जाऊ नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी मजबूत बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. मात्र, आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी हे बॅरिकेट्स पार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अखिलेश त्रिपाटी या आंदोलनात सहभागी होते.

आंदोलन तीव्र होत असताना आम आदमी पक्षाचे माजी आमदार अखिलेश त्रिपाठी बॅरिकेट्स पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना थेट उचलून बॅरिकेट्सवर फेकून दिले. यामध्ये अखिलेश त्रिपाठी अत्यंत वाईट पद्धतीने खाली आदळल्याचं स्पष्ट दिसत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

Advertisement

संजय सिंह यांचा दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीवर दिल्ली पोलिसांनी जनावरांसारखा अत्याचार केला आहे, असा घणाघाती आरोप संजय सिंह यांनी केला. या प्रकारामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.

Advertisement
Tags :

.