For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकिनकेरे-चलवेनहट्टी रस्त्यावर मोठे भगदाड

10:29 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेकिनकेरे चलवेनहट्टी रस्त्यावर मोठे भगदाड
Advertisement

वेळीच दुऊस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता

Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

बेकिनकेरे-चलवेनहट्टी या मुख्य रस्त्यावर तलावाजवळील भागात मोठे भगदाड पडले असून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित खाते लक्ष देणार काय, अशी वाहनधारकांतून चर्चा चालू आहे. या रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असून दुचाकी, चारचाकी व मोठी वाहने येथून जात येत असतात. याशिवाय जनावरे याच रस्त्यावरून तलावाकडे शेतकरी घेऊन जात असतात. रात्रीच्या वेळी इथून जाणे म्हणजे धोकादायक वाटते. येथील लोकप्रतिनिधींनी देखील याची अद्याप दखल घेतली नसून संबंधित तालुका पंचायत विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या रस्त्यात पडलेले मोठे भगदाड लवकरात लवकर दुऊस्त करून रस्ता जनतेला खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे.रात्रीच्या वेळी एखादे चारचाकी किंवा दुचाकी वाहन अंधारात या खड्ड्यात पडल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी लवकरात लवकर हे काम हाती घ्यावे, अशी या भागातील जनतेची व वाहनधारकांची मागणी आहे. हा रस्ता दोन्ही भागातील विविध गावांना जाण्यासाठी जवळचा असल्यामुळे या रस्त्यावरूनच मोठी वाहतूक सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.