कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठी मोठी ऑर्डर

06:50 AM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय नौदल-वायुदल घेणार निर्णय : ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली होती मोठी भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भारतीय वायुदल आणि नौदल ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठी एक मोठी ऑर्डर देणार आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या सैन्यतळांचे मोठे नुकसान घडवून आणले होते.

संरक्षण मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक लवकरच होणार असून यात मोठ्या संख्येत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली जाणार असल्याचे एक संरक्षणतज्ञाने सांगितले आहे. ही खरेदी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांसाठी केली जाणार आहे.

ब्राह्मोस एक दीर्घ पल्ल्याची सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली असून ती जमीन, समुद्र आणि आकाशातूनही डागता येऊ शकते. ब्राह्मोसला डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएमकडून संयुक्तपणे विकसित करण्यात आले आहे. नौदल स्वत:च्या वीर-श्रेणी युद्धनौकांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करणार अहे. तर वायुदल स्वत:चे लढाऊ विमान एसयू-30एमकेआयच्या ताफ्यात या घातक क्षेपणास्त्रांना तैनात करणार आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापर

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता ज्यात 26 पर्यटकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल कारवाई करत भारताने 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अ•dयांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या नागरी आणि सैन्यतळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे बहुतांश हल्ले उधळून लावले होते. यानंतर भारताने पाकिस्तानच्या अनेक वायुतळांवर एकाचवेळी हल्ला चढविला होता. या कारवाईकरता भारतीय सैन्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ब्राह्मोसने विध्वंस घडविल्यावर पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article