For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Silver Price : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! इतिहासात पहिल्यांदाच चांदीने प्रति किलो ३ लाखांचा ओलांडला टप्पा

06:15 PM Jan 20, 2026 IST | NEETA POTDAR
silver price   गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी  इतिहासात पहिल्यांदाच चांदीने प्रति किलो ३ लाखांचा ओलांडला टप्पा
Advertisement

                               चांदीने इतिहास घडवून प्रतिकिलो ३ लाख रुपये ओलांडले

Advertisement

कोल्हापुर : मोडिटी मार्केटमध्ये सोमवार, १९ रोजी चांदीच्या किमतीने इतिहास रचून प्रथमच ३ लाख रुपये प्रतिकिलोची पातळी ओलांडली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील व्यवहारादरम्यान सकाळच्या सत्रातच चांदी १३,५५३ रुपये किंवा ४.७१ टक्क्यांनी वाढून ३,०१,३१५ रुपये प्रतिकिलो या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली.

देशांतर्गत वायदे बाजारात चांदीने प्रतिकिलो ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिवसअखेरपर्यंत हा दर प्रतिकिलो ३ लाख ४ हजार चांदीचा दर महिन्यात प्रतिकिलो २ लाखांवरून ३ लाखसोन्याचा वर पोहोचला मजबूत गुंतवणुकीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे चांदीच्या दरात कमालीची वाढ नोंदवण्यात आली.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंजबर (एमसीएक्स) चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. त्यामुळेच सोमवारी एमसीएक्सवर चांदीची किंमत ३ लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. केवळ एका दिवसात चांदीच्या दरात १४ हजार रुपयांपत्ना जास्त वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव २.८७ लाख रुपयांच्या जवळ होता. गेल्या माहिन्यात १५ डिसेंबर २०२५ च्या आसपास चांदी पहिल्यांदा २ लाख रुपयांवर पोहोचली. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच हा वर ३ लाखांवर पोहोचला. अर्थातच चांदीला २ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी फका १ महिना लागला. त्यापूर्वी १ ते २ लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी ९ महिने लागले होते. तर ५० हजारांवरून १ लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी १४ वर्षे लागल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

नववर्षातील चांदीचा प्रतिकिलो भाव....
३१ डिसेंबर २०२५
२,३५,७०९ रुपये
१९ जानेवारी २०२६
३,०४,००० रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी
चांदीने देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवा विक्रम निर्माण केला. जागतिक बाजारात चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची किंमत ५.८१ अमेरिकन डॉलर्स किंवा ६.५६ टक्क्यांनी वाढून ९४.३५ अमेरिकन डॉलर्स प्रतिऔंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातील या ताकदीचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला.

सोन्यापेक्षाही चांदीच्या दरात झपाट्याने वाढ
विश्लेषकांच्या मते चांदीच्या भावाला अनेक आघाड्यांवरून पाठिंबा मिळत आहे. विशेषतःइलेक्ट्रॉनिक्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने चांदीच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय मौल्यवान धातूंसाठी अमेरिकन डॉलरची कमजोरी देखील सकारात्मक संकेत मानली जात आहे. या कारणांमुळे अलीकडच्या सत्रांमध्ये चांदीला सोन्यापेक्षाही अधिक मागणी असल्याचे दिसते.

वाढता वाढता वाढे
२०२५ हे वर्ष चांदीसाठी खूप खास होते. २०२६ मध्येही ही गती कायम राहील. नवीन वर्षाच्या अवघ्या १९ दिवसांत चांदीने आपले पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जानेवारी महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात किलोमागे ६५,६१४ रुपयांची वाढ झाली आहे.आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदीची किंमत २,३५,७०१ रुपये प्रतिकिलो होती. हा दर आता वाढून ३,०४,००० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

Advertisement
Tags :

.