For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

International Cricket Stadium Kolhapur | कोल्हापूरच्या क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! विकासवाडीत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

12:13 PM Feb 11, 2026 IST | NEETA POTDAR
international cricket stadium kolhapur   कोल्हापूरच्या क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी  विकासवाडीत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम
Advertisement

                                 कोल्हापुरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी मंगळवारी एक महत्वपूर्ण झाला. विकासवाडीत (ता. करवीर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी लागणारी ३२ एकर शासकीय जागा देण्यास मंत्रिमंडळांच्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली. मिळणारी सर्व जागा विकासवाडीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची असणार आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून जागा स्टेडियम उभारणीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात दिली जाईल.

कोल्हापुरात स्टेडियम व्हावे यासाठी १९८९ सालापासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (केडीसीए) सर्वच माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळांने शासन दरबारी केलेला पाठपुरावा लवकरच सत्यात येणार आहे. आमदार अमल महाडिक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अभ्यासपूर्ण अशी भूमिका घेऊन विकासवाडीत क्रिकेट स्टेडियम होणे का गरजेचे आहे, हे शासनाला पटवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरु ठेवला होता.

Advertisement

अजित पवार यांना क्रिकेट स्टेडियमसाठी जागा मिळवून देण्यास गळ घातली होती. सप्टेंबर २०२४ ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, केडीसीएचे अध्यक्षसंभाजीराजे छत्रपती, मंत्री आणि अधिकाऱ्यांची स्टेडियम आणि त्यासाठी लागणारी जागा देण्यासंदर्भात बैठक बोलवली. त्यात विविध अंगाने चर्चा केली. या चर्चेला गांभिर्याने घेऊन पवार यांनी स्टेडियमसाठी विकासवाडीतील जागा देण्यास समर्थता दर्शवली होती. तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी विकासवाडीतील जागा मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची सूचना केली होती.

त्यानुसार येडगे यांनी ही २०२४ सालीच शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि स्टेडियमसाठी ३२ एकर जागा देण्यास मंजुरी दिली.
ऐतिहासिक निर्णय केडीसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर क्रिकेट > स्टेडियमसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा देण्यास पुढाकार घेतला होता. मंत्रिमंडळाने जागा देण्याला अंतिम मंजुरी दिली, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

प्रतिभावान खेळाडूंना संधी
आता लवकर जागा हस्तांतरीत करुन स्टेडियम उभारले जावे. जेणेकरुन प्रतिभावान खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळत राहिल. आगामी काळात क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव झळकणार याचा विशेष आनंद वाटतो आहे, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.