मोठी बातमी! ५ अन् १५ वर्षांच्या मुलांना आधार बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य
सोलापूर -सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बालकांनी ५ वर्षे व १५ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा विद्यार्थ्यांचे आधार बायोमेटिक अपडेट करणे आवश्यक आहे. आधारमधील बायोमेटिक माहिती अद्ययावत नसल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच शैक्षणिक नोंदी अद्ययावत करताना अडचणी येऊ शकतात.
लहान बयात तयार केलेल्या आधार कार्डमध्ये मुलांच्या बायोमेट्रिक माहितीत कालांतराने बदल होतात. त्यामुळे ५ वर्षे पूर्णझाल्यानंतर आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (रैंक) करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत बोटांचे ठसे, आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत केले जाते.
शैक्षणिक नोंदींसाठी आधार
अपडेट महत्त्वाचे
मनपा सोलापूर अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचा वापर विविध शैक्षणिक व शासकीय योजनांसाठी केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधारमधील माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे.
आधार अपडेट न केल्यास अडचणी
दीर्घकाळ आधारचे बायोमेट्रिक अपडेट न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक नोंदी व शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात.
पालकांनी काय करावे?
मनपा सोलापूर क्षेत्रातील पालकांनी आपल्या पाल्याचे वय तपासून ५ किंवा १५ बर्षे पूर्ण झाली असल्यास जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे. आधार अपडेट करताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.