For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

150 वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘बिग मिश्रा पेढा’चे पणजीत नवे भव्य दालन; धारवाडच्या प्रसिद्ध मिठाई ब्रँडचा विस्तार; पारंपरिक मिठाईंसह लाईव्ह किचनचा अनुभवही मिळणार

07:23 PM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
150 वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘बिग मिश्रा पेढा’चे पणजीत नवे भव्य दालन  धारवाडच्या प्रसिद्ध मिठाई ब्रँडचा विस्तार  पारंपरिक मिठाईंसह लाईव्ह किचनचा अनुभवही मिळणार
Advertisement

पणजी, प्रतिनिधी :अस्सल चव, उत्तम दर्जा आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बिग मिश्रा पेढा’ या ब्रँडचे गोव्यातील 15 वर्षा पुर्वी सुरू पहिले दालन नुकतेच नूतनीकरण केले आहे या नवीन भव्य दालनाचा शुभारंभ 11 ऑक्टोबर 2026 रोजी होत आहे गोमंतकीयांच्या सेवेत दाखल झाले आहे..धारवाड येथील तब्बल 150 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या सुप्रसिद्ध ब्रँडचे नवीन दालन गोव्यातील दुकान क्रमांक 1 ते 5, निझारी भवन, डॉ. पिसुर्लेकर रस्ता, पणजी-गोवा येथे ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे. या दालनामध्ये बिग मिश्रा पेढा या पारंपरिक मिठाईसोबतच विविध प्रकारच्या नमकीनचा अनुभव ग्राहकांना घेता येईल, अशी माहिती व्यवस्थापक श्रीधर बोरकर यांनी दिली. यावेळी अक्षय पाटील, ज्ञानदेव पाटील उपस्थित होते.

Advertisement

260 हून अधिक शाखांचे जाळे
बिग मिश्रा पेढा हा ब्रँड केवळ कर्नाटकपुरता मर्यादित राहिला नसून गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा यांसह विविध राज्यांमध्ये पसरलेला आहे. गोवा मध्ये 20 शाखा कार्यरत आहे. सध्या संपूर्ण भारतात या ब्रँडच्या 260 हून अधिक शाखा ग्राहकांना अविरत सेवा देत आहेत. पणजीतील हे नवीन दालन याच यशाच्या प्रवासातील एक पुढचे पाऊल आहे.गोव्यामध्ये आमची वीस दुकाने आहेत

ताजी मिठाई आणि नाविन्यपूर्ण पदार्थांची मेजवानी
पणजीतील या नवीन दालनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना बिग मिश्रा पेढ्याची प्रसिद्ध मिठाई तसेच काही खाद्यपदार्थ थेट ग्राहकांसमोर ताजे तयार करून देण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. यामध्ये बेळगावचा प्रसिद्ध कुंदा, करदंट, तुपातील म्हैसूरपाक आणि लाल पेढा यांसह विविध स्वादिष्ट पारंपरिक मिठाईंचा समावेश आहे.

Advertisement

प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या जोरावर विस्तार
बिग मिश्रा पेढ्याचे व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. संजय गणेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय आज देशात विस्तारत आहे. श्री. संजय मिश्रा यांनी सांगितले की, "गेल्या अनेक वर्षांपासून केवळ प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर आम्ही ग्राहकांचे मन जिंकले आहे. ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचे प्रेम हीच आमच्या यशाची प्रमुख प्रेरणा आहे. गोवामधील हे नवीन दालन सुरू करताना गोमंतकीयांचा प्रेमळ प्रतिसाद, आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."

मुख्य आकर्षण ः पारंपरिक चवींची मेजवानी!
पणजीतील या नवीन दालनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्राहकांना केवळ मिठाई खरेदीच नाही, तर 'लाईव्ह किचन'चा (Live Kitchen) एक अनोखा अनुभव घेता येणार आहे. 'बिग मिश्रा पेढा'चे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि मिठाई थेट ग्राहकांसमोर अगदी ताजी तयार करून दिली जाईल. या दालनात धारवाडचा सुप्रसिद्ध मिश्रा पेढा, बेळगावचा खास कुंदा, पौष्टिक करदंट, शुद्ध तुपातील म्हैसूरपाक आणि लाल पेढा यांसारख्या अनेक स्वादिष्ट पारंपरिक मिठाईंचा आस्वाद घेता येईल. यासोबतच खवय्यांसाठी विविध प्रकारच्या खमंग नमकीन पदार्थांची आणि नाविन्यपूर्ण पदार्थांची खास मेजवानी येथे उपलब्ध असणार आहे.

पणजीत येथे आहे नवे दालन

‘बिग मिश्रा पेढा’चे नूतनीकरण केलेले दालन दुकान क्रमांक 1 ते 5, निझारी भवन, डॉ. पिसुर्लेकर रस्ता, पणजी–गोवा, पिनकोड 403001४ येथे आहे. पारंपरिक मिठाईंचा वारसा आधुनिक ग्राहकांच्या पसंतीशी जोडत, गोव्यातील ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असेही व्यवस्थापक श्रीधर बोरकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.