For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बिग मराठी बायोस्कोप सिझन 3’ची घोषणा

10:45 AM Jan 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘बिग मराठी बायोस्कोप सिझन 3’ची घोषणा
Advertisement

‘लोकमान्य सोसायटी’ मुख्य प्रायोजक : सुबोध भावेंकडे निवेदनाची धुरा : पुणे-मुंबईत प्रीमियरसाठी सज्ज 

Advertisement

पुणे :  ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ प्रायोजित आणि ‘बिग एफएम मराठी’ आयोजित ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 3’ची मंगळवारी घोषणा करण्यात आली. अभिनेते सुबोध भावे, ‘लोकमान्य’चे व्यवस्थापकीय संचालक सुशील जाधव, सीएफओ वीरसिंह भोसले, देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटरचे डॉ. आनंद देशपांडे, तेजश्री देशपांडे, डॉ. सुनीता पंडित, वैजयंती शेवडे, डॉ. किशोर पंडित आदी या वेळी उपस्थित होते. हा शो पुण्यात सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 आणि रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी फक्त बिग एफएमवर 27 जानेवारी रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.

सीझन 3 हा मनोरंजक अशा ‘जोडी स्पेशल’ संकल्पनेवर आधारित असेल, यामध्ये काही प्रतिष्ठित जोड्यांचा गौरव करण्यात येईल. यात ऑन-स्क्रीन आवडत्या जोड्यांपासून ते गायक-संगीतकार, दिग्दर्शक-अभिनेता आणि गीतकार-संगीतकार यांच्यासारख्या सर्जनशील सहकाऱ्यांचा समावेश असेल. अष्टपैलू प्रतिभा असलेले अभिनेते, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा यजमानपदाची धुरा सांभाळत मराठी चित्रपटसृष्टीचे सार आणि माहात्म्य सांगणार आहेत. आपल्या उत्कृष्ट निवेदनाच्या माध्यमातून सुबोध भावे हे प्रेक्षकांना सिनेसृष्टीच्या रोमांचक सफरीवर घेऊन जातील आणि त्यातील सर्वोत्कृष्ट क्षण पुढे आणतील. बिग मराठी बायोस्कोपचा आणखी एक सीझन होस्ट करताना आपल्याला आनंद होत असल्याच्या भावनाही भावे यांनी व्यक्त केल्या. सुशील जाधव म्हणाले, ‘लोकमान्य सोसायटी’ ही वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असते. हा शो युनिक आहे. रेडिओतून स्टोरी टेलिंग ऐकायला मिळणे, ही संकल्पनाच वेगळी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.