कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजगावात गव्यांच्या कळपाची रिक्षाला धडक

03:26 PM Nov 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0;
Advertisement

सहा आसनी रिक्षाचे मोठे नुकसान ; सुदैवाने प्रवासी बचावले

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सावंतवाडी - शिरोडा राज्य मार्गावरील माजगाव दत्त मंदीर नजीक कै. भाईसाहेब सावंत समाधी स्थळ जवळ शनिवारी सकाळी दिवसाढवळ्या गवारेड्यांचा कळपाची तळवडे ते सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या सहा आसनी रिक्षाला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानाने रिक्षा रस्त्याच्या साईड पट्टीवर जाऊन कलंडून थांबल्याने अनर्थ घडला . मात्र अपघातात सहा आसनी रिक्षामधील शाळकरी मुलांसह प्रवासी बालबाल बचावले. तर चालक लवू पेडणेकर (रा . तळवडे )हे किरकोळ जखमी झाले. मात्र अपघातात रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर एक काच तुटून रिक्षात पडली.त्यावेळी रिक्षातील प्रवासी तसेच चालक किरकोळ जखमी झाले. अपघात घडताच या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी वाहने थांबून रिक्षा मधील प्रवाशांना व चालकांना बाहेर काढण्यास मदत केली. अपघाताची माहिती समजताच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते तसेच माजगाव ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, सदस्य संतोष वेजरे, यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी रिक्षा चालक लवू सदाशिव पेडणेकर रा.तळवडे यांची त्यांनी विचारपूस केली.त्यानंतर वनविभागाला संपर्क करीत अपघाताची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे माजगाव वनपाल प्रमोद राणे, मळगाव विभागाचे मोहन घोटूकडे तसेच पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, दिपक शिंदे, कॉ.सावळ आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.यावेळी रिक्षाचे झालेले नुकसान भरपाई वनविभागाकडून मिळावी अशी मागणी रिक्षा चालकासह उपस्थित ग्रामस्थांनी लावून धरली.वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला.नुकसान भरपाई न मिळाल्यास रास्तारोको करु असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला.या परिसरात गव्यांचा वावर नेहमीच असतो . दोनच दिवसापूर्वी याच ठिकाणी गव्या रेड्याची धडक बसून दुचाकीवरील माजगावचे प्रभारी सरपंच रिचर्ड डिमेलो व ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे आणि अन्य एक असे तिघेजण जखमी झाले होते. या ठिकाणीगव्यांचा कळप रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. अनेकजण जखमी तसेच जायबंदी देखील झाले आहेत.त्यामुळे वनविभागाने या गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,अशी मागणी आता जोर धरत आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी गव्या रेड्यांच्या कळपांची धडक बसून मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. मात्र वन विभागाच्या नियमांनुसार वन्य प्राण्यांची धडक बसून अपघात घडल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. जखमींनाच आपले वैद्यकीय उपचार व वाहनांची नुकसानी भरण्याची वेळ येते. वन्य प्राण्यांच्या अपघातामुळे होणाऱ्या दुखापती व वाहनांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी वनविभागाने आपल्या नियमात सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article