For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टोयोटा’ची कर्नाटक राज्यात मोठी गुंतवणूक

06:53 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘टोयोटा’ची कर्नाटक राज्यात मोठी गुंतवणूक
Advertisement

कंपनी जवळपास 1,200 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कर्नाटक राज्य औद्योगिक आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. याच दिशेने, जपानची ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा मोटर कॉर्पोरेशनची भारतीय शाखा असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटरने राज्यात 1200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

Advertisement

ही कंपनी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी क्विन सिटी प्रकल्पात आपले जागतिक ‘बिझइंटेल हब’ उभारणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत केली जाईल आणि यामुळे रोजगार, तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासंदर्भात सोमवारी बंगळूरु येथे कर्नाटक सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उद्योगमंत्री एम. बी. पाटील हेही उपस्थित होते.

हाय-टेक हबमध्ये 300 एकर जमीन

दाबसपेटे आणि दो•बल्लापूर दरम्यान विकसित होत असलेल्या क्विन सिटीमध्ये या प्रकल्पासाठी सुमारे 300 एकर जमीन मंजूर केली आहे. या आधुनिक हबमध्ये वाहन उत्पादन, संशोधन आणि चाचणीशी संबंधित सुविधा विकसित केल्या जातील. याच्या माध्यमातून टोयोटा नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक ऑटोमोबाईल सोल्यूशन्सवर काम करेल.  उद्योगमंत्री एम. बी. पाटील म्हणाले की, प्रकल्पातील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे. ही स्मार्ट सिटी नवोन्मेष, आरोग्यसेवा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारखी क्षेत्रे लक्षात घेऊन विकसित केली जात आहे.

1 लाख रोजगार होणार उपलब्ध

क्विन सिटी सुमारे 5800 एकर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने विकसित केली जात आहे. सध्या, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, संपूर्ण प्रकल्पामुळे भविष्यात सुमारे 48,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होऊ शकते आणि सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. तज्ञांच्या मते, टोयोटाच्या या गुंतवणुकीमुळे कर्नाटक ऑटोमोबाईल, संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रात अधिक मजबूत होईल.

Advertisement
Tags :

.