For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावला मोठे उद्योग आणणार

11:35 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावला मोठे उद्योग आणणार
Advertisement

भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : बेळगावदेशाच्या विकासासाठी मोदींशिवाय पर्याय नाही. अनेक वर्षांपासून रखडलेला राम मंदिराचा प्रश्न मोदी यांच्यामुळेच मार्गी लागला. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना, गृहिणींसाठी उज्ज्वला योजना, नवउद्योजकांसाठी मुद्रा योजना सुरू केल्या. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगावला अत्याधुनिक विमानतळ तसेच रेल्वेस्थानक मिळाले आहे. बेळगाव ही आपली कर्मभूमी असून बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी कंपन्या तसेच मोठे उद्योग आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असे भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. चिकोडी मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी आपण मागील पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच यावेळी मोदी सरकार 400 पार जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे नेते येडियुराप्पा यांनी काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार टीका केली. माजी आमदार संजय पाटील यांनी राम मंदिराचा प्रश्न उचलून धरला. खासदार मंगला अंगडी यांनी मागील अडीच वर्षात केलेल्या कामांची माहिती देत जगदीश शेट्टर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले, बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा कायापालट करण्यात आला. यापुढेही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहावे. बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने जगदीश शेट्टर विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, माजी मंत्री शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्यासह इतर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.