इंडसइंड बँकेच्या समभागात मोठी पडझड
डेरिव्हेटीव्ह खात्यात गडबड झाल्याचे निमित्त : 27 टक्के घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
इंडसइंड बँकेचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात 26 टक्के इतके घसरलेले दिसले. डेरिव्हेटीव्ह खात्यामध्ये गडबड झाल्याच्या बातमीने समभागावर परिणाम दिसला आहे.
26 टक्के घसरले समभाग
मंगळवारी 11 मार्च रोजी इंडसइंड बँकेचे समभाग 26 टक्के इतके घसरत 196 रुपयांनी कमी होत 670 रुपयांवर घसरले होते. नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात समभाग घसरलेला आहे. डेरिव्हेटीव्ह खात्यात गडबड झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बँकेच्या उत्पन्नात घट येऊ शकते. उत्पन्नात 2.35 टक्के इतकी घट होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
आर्थिक स्थिती
सोमवारी बँकेच्या अंतर्गत चाचणी अहवालादरम्यान विदेशी चलन व्यवहारात गडबड केली गेल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी बँकेच्या उत्पन्नात 1600 ते 2000 कोटी रुपयांची घट होऊ शकते. तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या महसुलात 8 टक्के वाढ झालेली असली तरी नफा 39 टक्के कमी झाला होता. देशातील पाचव्या नंबरच्या खासगी क्षेत्रातील बँकेने 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत 1402 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.
फेब्रुवारी 2025 पर्यंत 35 म्युच्युअल फंडसकडे इंडसइंड बँकेचे 20.88 कोटी समभाग होते ज्यांचे मूल्य 20,670 कोटी रुपये इतके होते. त्यांचे मूल्य आता घटून 14,600 कोटी रुपये झाले आहे.