For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्सच्या कार्सवर मिळणार मोठी सवलत

06:18 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्सच्या कार्सवर मिळणार मोठी सवलत
Advertisement

जवळपास 2 लाखांपर्यंत सूट देण्याची कंपनीची घोषणा : सफारी, टियागोही झाली स्वस्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सणासुदीच्या आधी कार उत्पादक त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देतात. या दिशेने टाटा मोटर्सने फेस्टिव्हल ऑफ कार ऑफरही जाहीर केली आहे. ज्यामध्ये कंपनीने आपल्या अनेक लोकप्रिय वाहनांवर 2.05 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्व पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार आणि एसयूव्हीसाठी उपलब्ध आहे. चला या ऑफरबद्दलचा सारा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Advertisement

कंपनीच्या कोणत्या मॉडेल कारवर किती रुपयांची खास सवलतीचा फायदा ग्राहकांना उठवता येणार आहे त्याबद्दलची माहिती पाहुया.

टाटा सफारी आता उपलब्ध

कंपनीने टाटा सफारीवर 1,80,000 रुपयांची कपात जाहीर केली आहे. त्यानंतर या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15,49,000 रुपये झाली आहे.

टाटा नेक्सॉनवर इतकी सूट

कंपनीने टाटा नेक्सॉनवर 80,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. त्यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 7,99,990 रुपये झाली आहे.

अल्ट्राजवर इतकी सूट

टाटा आपल्या अल्ट्राजवर 45 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्यानंतर त्याची एक्स-शोरूम किंमत 6,49,900 रुपये झाली आहे.

टाटा टीयागो, टीगोरवर इतकी सूट

टाटा टीयागोवर 65,000 पर्यंत सूट मिळत आहे, त्यामुळे ही कार आता 4,99,900 च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. त्याच वेळी, कंपनीने टाटा टिगोरवर 30 हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे, ज्यामुळे किंमत आता सवलतीनंतर 5,99,000 रुपये झाली आहे.

Advertisement
Tags :

.