Kolhapur Breaking - राज्य प्रशासनाचा मोठा निर्णय: कोल्हापूरला मिळाले नवीन जिल्हाधिकारी, आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर -राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करत सरकारने एकाचवेळी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात कोल्हापुरातील प्रमुख तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकाचवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हाधिकारीपदी डॉ. विजय राठोड तर महापालिका आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड तर जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. जॅसमिन यांची नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती झाली आहे. ते २०१४ महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एमयूएचएस नाशिक येथून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (जेटी. सीईओ विशेष प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. सध्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूडके. मंजुलक्ष्मी यांची गुरूवारी रात्री पुणे कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तमहानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. भारूड यांची मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
महापालिकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून कार्यरत होत्या. आता त्या आयुक्त आहेत. कोल्हापुरात येण्यापूर्वी त्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची बदली पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली आहे.डॉ. जैसमिन जि.प. च्या सीईओ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी कार्तिकयन. एस यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. रत्नागिरी जिल्हयातील राजापूर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी डॉ. गॅसमिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
शासनाने गुरुवारी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी सहायक जिल्हाधिकारी डॉ. जें समिन यांची नियुक्ती केली आहे.कार्तिकयन. एस यांनी २० मार्च २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्ळ्यात शिक्षण आणि आरोग्याबर भरीव काम केले. जिल्हा परिषदेच्या शाळा अत्याधुनिक केल्या. जिल्हयातील शाळामध्ये त्यांनी आमूलाग्र सुधार केल्या. शाळामध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहे बांधली.
त्यांच्या सुधारणा कालावधीतच जिल्हा परिषदेचीनिवडणूक पार पडली. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गॅसमिन लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी शिंगण यांची बदलीअपर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण याच्या बदलीचे आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश बरुडकर यांच्या सहीने काढले आहेत. वर्षा सिंघण यांची बदली अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक), महसूल व वन विभाग मंत्रालय येथे केली आहेत.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची बदली अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय येथे झाली.सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील संजय शंकर शिंदे, अपर जिल्हाधिकारी, व जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वर्षों शिंगण यांची सध्याच्या कार्यरत पदावरुन बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. संजय शिंदे व वर्षा शिंगण यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्ररित्या काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. संजय शिंदे यांनी अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई व वर्षा शिंगण अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक), महसूल व वन विभाग मंत्रालय येथे तत्काळ रुजू व्हावे. असे देखील म्हटले आहे.