महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस, राजदकडून मोठा भ्रष्टाचार : मोदी

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारच्या जमुई येथे प्रचारसभा : सध्याचा भारत दहशतवाद्यांना अद्दल घडविणारा

Advertisement

वृत्तसंस्था /जमुई

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी जमुईच्या खैरा येथे गुरुवारी प्रचारसभेला संबोधित केले आहे. यादरम्यान त्यांनी लालूप्रसाद यादव यांचे जंगलराज, भ्रष्टाचार आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राजद बिहारला पुन्हा ‘कंदील’युगात नेऊ पाहत असल्याची टीका मोदींनी यावेळी केली आहे. सध्या जो आट्यासाठी तळमळत आहे, तेथील (पाकिस्तान) दहशतवादी आमच्या देशात हल्ले करत होते. तर काँग्रेस अन्य देशांकडे तक्रारी मांडण्यातच धन्यता मानत होता. परंतु हे खपवून घेणार नसल्याचे आम्ही दाखवून दिले. भारत हा महान पाटलिपुत्र आणि चंद्रगुप्त मौर्य यांचा देश आहे. सध्याचा भारत दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारत आहे, असे उद्गार मोदींनी काढले आहेत. जमुई येथे हे प्रचारसभा आहे का विजयसभा असे प्रश्नार्थक विधान करत मोदींनी चिराग पासवान आणि जमुई येथील उमेदवाराला स्वत:चा बंधू असे संबोधिले आहे.  काँग्रेस आणि राजदने देशाचे नाव खराब केले आहे. राजदचे गुंड सर्वसामान्यांच्या जमिनीवर कब्जा करतात. राजद सरकारमध्ये युवतींना रस्त्यांवरून उचलून नेले जायचे असे नमूद करत मोदींनी बिहारमधील जंगलराजचा उल्लेख केला आहे. जे लोक नोकरीच्या बदल्यात जमिनी नावावर करवून घेत होते ते बिहारचे कल्याण काय करणार असे म्हणत पंतप्रधान मोदींनी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. नितीश कुमार हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना एकही तक्रार आली नाही, परंतु लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना अनेक घोटाळे झाल्याचा दावा मोदींनी केला आहे.

काँग्रेसकडून राम मंदिराची चेष्टा

आमच्या सरकारने राम मंदिराचे 500 वर्षे जुने स्वप्न साकार केले. तर राजद आणि काँग्रेसने मंदिर उभारणी होऊ नये म्हणून पूर्ण शक्ती पणाला लावली होती. काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनी राम मंदिराचा उपहास अन् अपमान केला आहे.  त्यांनी बिहार आणि बिहारी अस्मितेचा अपमान केला आहे. कर्पुरी ठाकूर यांचा अपमान केला. आमच्या सरकारने कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्यावर काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनी विरोध केल्याचा दावा मोदींनी केला आहे.

लालू-राबडीवर बरसले नितीश

लालूप्रसाद आणि राबडी देवी यांना 15 वर्षे संधी मिळाली, त्यांच्या शासकाळात संध्याकाळी घरातून कुणी बाहेर पडू शकत नव्हता. ही स्थिती दूर करण्यासाठी आम्ही काम केले आहे. बिहारला जंगलराजपासून वाचविण्यासाठी आम्ही भाजपसोबत आलो आहोत. आम्ही लोक राज्यात काम करत आहोत. तर केंद्रात 10 वर्षांपासून पंतप्रधान मोदी उत्तम काम करत आहेत असे उद्गार नितीश यांनी काढले आहेत.

आता कुठे जाणार नाही!

या सभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या शासनकाळातील जंगलराजची आठवण उपस्थित समुदायाला करून दिली. पूर्वी बिहारमध्ये हिंदू-मुस्लीम संघर्ष व्हायचा. परंतु आता सर्वकाही नियंत्रणात आहे. राजद आणि काँग्रेसला सत्ता मिळाली तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येणार असल्याचे नितीश यांनी नमूद केले आहे. यादरम्यान नितीश यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून आपण अन्य कुठल्याही आघाडीत जाणार नसल्याचे सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article