For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ichalkaranji crime news | इचलकरंजीत गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश! पंचगंगा नदी परिसरात पोलिसांनी रचला सापळा

02:15 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
ichalkaranji crime news   इचलकरंजीत गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश  पंचगंगा नदी परिसरात पोलिसांनी रचला सापळा
Advertisement

                                 इचलकरंजीत गांजा तस्करीचा पर्दाफाश

Advertisement

इचलकरंजी -शहराजवळील पंचगंगा नदीच्या जॅकवेल परिसरात सुरू असलेल्या गांजा तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ४ किलो १५० ग्रॅम गांज्यासह एकूण २ लाख २४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल सागर जगन्नाथ चौगले यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास शेळके मळा ते पंचगंगा नदी जॅकवेल मार्गावर पोलिसांनी सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गांज्याची वाहतूक करणार असल्याची खात्री झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनीछापा टाकून सारंग खंडू भोसले (वय २१, रा. मिरज), अभय दिगंबर धुमाळे (वय २१, रा. बावणे गल्ली, इचलकरंजी) आणि रफिक नदाफ (रा. बोरगाव, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले.

Advertisement

तपासात भोसले व धुमाळे हे नदाफकडून गांजा घेऊन त्याची ज वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपींच्या ताब्यातून काळपट हिरवट रंगाचा, उग्र ओलसर गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालात गांज्यासह एक मोपेड, दोन मोबाईल हँडसेट, रोख रक्कम आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.