भारतीय संघाला मोठा झटका,जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे.बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
बुमराहच्या जागी हर्षित राणाचा समावेश
दरम्यान जसप्रीत बुमराह याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात हर्षित राणा या युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आल्याची माहिती निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.