महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्तरप्रदेशात काँग्रेसला मोठा झटका

06:25 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपमध्ये सामील झाले अजय कपूर

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

Advertisement

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कानपूरमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अजय कपूर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजय कपूर हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, बिहारचे सह-प्रभारी आणि माजी आमदार आहेत.

अजय कपूर हे किदवई नगर आणि गोविंदनगर मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. कपूर हे उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचे नातलग आहेत. अजय कपूर यांना कानपूरच्या राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाते. समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केल्यावर कानपूर मतदारसंघाच्या उमेदवारीचे ते प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसच्या राज्यस्तरीय निवडणूक संचालन समितीच्या बैठकीत कानपूर मतदारसंघाकरता त्यांचेच नाव सुचविण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायसवाल आणि अजय कपूर असे दोन गट कानपूर काँग्रेसमध्ये होते.

अजय कपूर यांना आता भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात आहे. कपूर यांचे बंधू उद्योजक विजय कपूर आणि भारतीय चेस फेडरेशनचे अध्यक्ष संजय कपूर यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article