Solapur Municipal Elections 2026 | सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; खासदार प्रणिती शिंदेंच्या बाल्लेकिल्ल्यात भाजपने मारली बाजी
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या घरासमोर भाजपची दणदणीत विजय
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडे अख्खा राज्याचे लक्ष लागून राहीले होत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या बाल्लेकिल्ल्यात काय चाललेय या कडे जिल्हासह राज्याच्या नजारा लागून होत्या अशातच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना मोठा धक्का लागल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच जुन घर सोलापूर विजयपूर महामार्गावर जाई जुई या नावाने आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागलेले होते. प्रभाग २३, जो काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या घराचा आहे, येथे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.
यंदा भाजपच्या पॅनलने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. काँग्रेसच्या दीपाली शहा यांचा पराभव भाजपच्या आरती वाकसे यांनी केला, तर शिवसेना ठाकरे गटाच्या अलका राठोड यांचा पराभव भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांनी केला. तसेच महाविकास आघाडीच्या लक्ष्मण जाधव उर्फ काका यांचा पराभव भाजपच्या राजशेखर पाटील यांनी केला.
यामुळे खासदार प्रणिती शिंदेंच्या घराचे प्रभाग २३ भाजपच्या पॅनलकडे गेला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा पराभव झेलावा लागला.