बिग बझारची ‘एफआरएल’ दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबईतील पीठासमोर सुनावणी
वृत्तसंस्था / मुंबई
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबईतील खंडपीठाने किशोर बियानी समुहाची कंपनी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास अनुमती दिली आहे. एप्रिल महिन्यात बँक ऑफ इंडियाने एफआरएल विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबईतील खंडपीठाने बुधवारी याप्रकरणी सुनावणी केली. कर्जात बुडालेल्या फ्युचर रिटेल लिमिटेडच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची अनुमती दिल्याचे लवादाने म्हटले आहे. फ्यूचर रिटेल लिमिटेड कर्जाचा डोंगर आहे. यातील मोठ वाटा बँक ऑफ इंडियाने दिलेल्या कर्जाचा आहे. विजय कुमार अय्यर यांना कंपनीचा आयआरपी (इनसॉल्व्हन्सी रिजोल्युशन प्रोफेशनल) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेझॉनकडून याप्रकरणी दाखल हस्तक्षेप याचिका लवादाने फेटाळली आहे. याचाच अर्थ एफआरएलला आता दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड द्यावे लागू शकते. कंपनीवर सुमारे 5,322.22 कोटी रुपयांची थकबाकी आहे.