Ashok Kharat case| भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; पत्नी कल्पना खरात फरार, मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11:56 AM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
अशोक खरातच्या मुलाला अटक!
Advertisement
नाशिक, - भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली आहे. आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अशोक खरात याच्यापत्नीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकाने अशोक खरात याच्या मुलाला अटक केली असून त्याची आता चौकशी होणार आहे.
दरम्यान, कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोन विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके नाशिक आणि पुणे यादिशेने रवाना झाली आहेत. अशोक खरातच्या नाशिकमधील निवासस्थानी
तपास केला असता कल्पना खरात तेथे आढळून आलेल्या नाहीत.
Advertisement
शिर्डी पोलीस ठाण्यात कल्पना खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कल्पना खरात, अशोक खरातसह अरविंद बाबके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांचा समावेश आहे.
Advertisement