Satara District Hospital | वाई पोलिसांची मोठी कारवाई; केबल चोरी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या!
04:33 PM Apr 02, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
आसरे परिसरातून केबल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस स्टेशन हद्दीत केबल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
वाई तालुक्यातील आसरे परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी प्रकरणात पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे २ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, तसेच जवळपास ९५० मीटर केबल जप्त करण्यात आली आहे.
Advertisement
या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.
Advertisement