महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामेश्वरम कॅफे स्फोटप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई

06:58 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुबळी, बेंगळूर, कोइम्बतूरसह 11 ठिकाणी छापे  : 2 सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, निवृत्त मुख्याध्यापकाची चौकशी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

व्हाईटफील्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांमध्ये 11 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. हुबळी-धारवाडमध्ये तीन ठिकाणी आणि बेंगळूर शहरात चार ठिकाणी छापेमारी करून झडती घेण्यात आली आहे. या छाप्यांच्या मदतीने एनआयएने स्फोटातील आरोपींशी निगडित महत्त्वाचे धागेदारे मिळविले आहेत. तसेच दहतशवाद्यांना मदत केलेल्या अन्य आरोपींची ओळख पटविली असल्याचे मानले जातेय.

बेंगळूरच्या कुमारस्वामी लेआउट आणि बनशंकरी येथे एकाच वेळी छापे टाकून तपासणी करण्यात आली. कोईम्बतूर येथील जाफर इक्बाल आणि नयन सादिक या डॉक्टरांच्या घरांवरही छापे टाकत महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यात आली. मंगळवारी पहाटे दोन पथकांनी बेंगळुरात कारवाई करत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याचप्रमाणे शेजारील घरांतूनही माहिती मिळविण्यात आली.  छाप्यावेळी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट आणि मंगळूरमधील कुकर बॉम्बस्फोटासंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे, असे एनआयएच्या सुत्रांनी सांगितले आहे.

बेंगळूरपाठोपाठ हुबळी-धारवाडमध्ये तीन ठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या. हुबळीच्या दक्षिण उपविभागातील गौसिया टाऊन येथे शोएब अब्दुल मिर्झा याच्या निवासस्थानावर छापा टाकून झडती घेण्यात आली. शोएब हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याच्या निवासस्थानी कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. 2012 मध्ये सिमी संघटनेच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची कारागृहातून मुक्तता झाली होती. आता एनआयएने त्याची चौकशी करून नोटीस बजावल्याचे सुत्रांकडून समजते.

अनंतपूरमध्येही पोहोचले एनआयएचे पथक

दुसरीकडे एनआयएचे पथक अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्गम येथेही पोहोचले. तेथील निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. अब्दुलचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मानले जातेय. अब्दुलच्या परिवाराचे दहशतवादी हल्ल्यामागील कनेक्शन आणि दहशतवादी कारवायांमधील कथित सहभागासंबंधी एनआयए तपास करत आहे.

आरोपींच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदारे

अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड झाली आहे.  याच्या आधारे हुबळी, बेंगळूर आणि कोईम्बतूरमध्ये छापे टाकण्यात आले.

बॉम्बस्फोट घडविणारा मुसावीर आणि सूत्रधार मोहम्मद मतीन यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड केली. रामेश्वरम कॅफेतील स्फोटापूर्वीच संशयित दहशतवाद्यांनी व्हाईटफिल्डच्या एसईझेड (स्पेशल इकॉनॉमिक झोन) भागाला लक्ष्य केल्याचे सांगितले होते. आयटीबीपी कंपन्यांच्या परिसरात स्फोट झाला तर त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटू शकतील. आयएसआयएस संघटना आपल्याला त्यांच्या संघटनेत सहज भरती करतील, या विश्वासाने त्यांनी कट रचना होता. मात्र, आयटी-बीटी कंपन्यांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने तेथे स्फोट घडविण्याचा कट यशस्वी झाला नाही. यामुळे रामेश्वरम कॅफे उडवून देण्याची योजना आखली होती. या घटनेत 9 जण जखमी झाले होते.

1 मार्च रोजी स्फोट

1 मार्च 2024 रोजी दुपारी 12.55 च्या सुमारास व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 10 जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरोपी मोहम्मद मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन यांना एनआयए अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या घटनेनंतर 43 दिवसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article