महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई

06:23 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिनालोआ कार्टेलचे दोन प्रमुख अटकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सिनालोआ कार्टेलच्या दोन प्रमुखांना अटक केली आहे. मॅक्सिकन सिनालोआ कार्टेलचे सह-संस्थापक इस्माइल ‘एल मेयो’ जंबाडा आणि एल चापोचा पुत्र जोक्विन गुजमॅन लोपेझला टेक्सासमध्ये अटक करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या गुन्हेगारी जगतात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

इस्माइल ‘एल मेयो’ जंबाडा हा 70 वर्षांचा असून तो मेक्सिकोच्या सर्वात धोकादायक ड्रग्स तस्करांपैकी एक आहे. त्याने एल चापोसोबत कुख्यात सिनालोआ कार्टेलची स्थापना केली होती. दशकांपासून तो अमली पदार्थांच्या तस्करीतील प्रमुख हस्तक राहिला आहे. आतापर्यंत तो कारवाईपासून बचावला होता.

तर गुजमॅन लोपेझ हा एल चापोच्या चार पुत्रांपैकी एक आहे. एल चापोच्या चारही पुत्रांना लिटिल चॅपोस नावाने ओळखले जाते. गुजमॅनला स्वत:च्या पित्याच्या गुन्हेगारी साम्राज्याची धुरा मिळाली आहे. याचबरोबर तो स्वत:च्या हिंसक वृत्तीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर 50 लाख डॉलर्सचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

जंबाडा आणि गुजमॅन लोपेझच्या अटकेमुळे सिनालोआ कार्टेलमध्ये अस्थिरता निर्माण होणार आहे. 2017 मध्ये अल चापोच्या प्रत्यार्पणापासून जंबाडा आणि लॉच चॅपिटोस यांच्यातील संबंध बिघडले आहेत. 50 हून अधिक देशांमध्ये अल चापोच्या कार्टेलकडून ड्रग्स तस्करी केली जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article