For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयडीबीआय’साठी लवकरच बोली

06:58 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आयडीबीआय’साठी लवकरच बोली
Advertisement

उदय कोटक आणि प्रेमा वाट्स खरेदी करण्याच्या तयारीत 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकार आणि भारतीय जीवन विमा (एलआयसी) आयडीबीआय बँकेमधील आपली 60.72 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. प्रेमा वाट्स यांच्या फेयरफॅक्स फायनाशिन्अल आणि कोटक महिंद्रा बँक हे दोघेही मोठी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. या दोन कंपन्यांच्या दरम्यान हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे चित्र आहे. दोन्हीकडून वित्तीय प्रस्ताव वेगवेगळे जमा करण्याची शक्यता आहे. सरकार आणि एलआयसी यांची आयडीबीआय बँकेत एकूण 90 टक्केपेक्षा अधिकची हिस्सेदारी आहे.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक बोली प्राप्त झाल्यानंतर आणि त्या उघडण्यापूर्वी बँकेची किमान विक्री किंमत म्हणजेच राखीव किंमत निश्चित केली जाईल. ही राखीव किंमत फक्त काही सरकारी अधिकाऱ्यांनाच माहिती असेल आणि ती बोली लावणाऱ्यांना उघड केली जाणार नाही.

सेबी महत्त्वाची भूमिका बजावेल

या प्रकरणाशी संबंधित लोकांनी असेही सांगितले की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या ओपन ऑफर प्राइसिंग यंत्रणेचा वापर राखीव किंमत निश्चित करण्यासाठी मापदंड म्हणून केला जाऊ शकतो.

आयडीबीआय बँकेच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाली होती, परंतु संभाव्य खरेदीदारांसाठी मार्ग सुलभ करण्यासाठी सरकारने उचललेल्या अनेक पावलांमुळे ती लांबली.

आरबीआयची अंतिम मान्यता आवश्यक

आयडीबीआय बँक खरेदी करणाऱ्या कंपनीला आरबीआयकडून अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. खरेदीदार बँक नियामकाच्या ‘योग्य आणि अयोग्य’ मानकांची पूर्तता करतो याची खात्री आरबीआय करेल. याशिवाय, भारतीय स्पर्धा आयोगसह इतर वैधानिक, नियामक प्राधिकरणांकडून मान्यता देखील आवश्यक आहे. यशस्वी बोली लावणाऱ्याला आयडीबीआय बँकेच्या अल्पसंख्याक भागधारकांना खुली ऑफर देखील द्यावी लागणार आहे.

80,000 कोटींचे ध्येय

सरकारने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत निर्गुंतवणुकीतून आणि मालमत्तेच्या मुद्रीकरणातून 80,000 कोटी रुपये उभारण्याचे ध्येय निश्चित केले आहे. अर्थसंकल्पानंतरच्या संवादात, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अरुणिश चावला म्हणाले की, आयडीबीआय बँकेचे धोरणात्मक निर्गुंतवणुकीचे काम तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे, याचा अर्थ तांत्रिक आणि  आर्थिक बोली आमंत्रित करण्यात आलेल्या नाहीत.

Advertisement
Tags :

.