For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिद्री ' पुन्हा राज्यात भारी ! यंदाच्या गळीतास उच्चांकी ३४०७ रुपये दर जाहीर; अध्यक्ष के. पी. पाटील यांची घोषणा

12:15 PM Dec 15, 2023 IST | Abhijeet Khandekar
बिद्री   पुन्हा राज्यात भारी   यंदाच्या गळीतास उच्चांकी ३४०७ रुपये दर जाहीर  अध्यक्ष के  पी  पाटील यांची घोषणा
Advertisement

सरवडे प्रतिनिधी

Advertisement

बिद्री ता कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला उच्चांकी ३४०७ रुपये दर जाहीर केला आहे. कारखान्याचे नुतन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज या दराची घोषणा केली. हा दर राज्याच्या साखर कारखानदारीतील सर्वाधिक असल्याचे समजते. नुतन अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी झाली. त्या प्रित्यर्थ उस उत्पादकांना उच्चांकी दर जाहीर करून पाटील यांनी सुखद धक्का दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, निवडणुकीदरम्यान कारखान्याच्या प्रशासनाने ३२०० रुपये प्रतिटन उसदर जाहीर केला होता. यामध्ये २०७ रुपयांची वाढ करुन यंदा प्रतिटन ३४०७ रुपये असा उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची एफआरपी प्रतीटन ३१९४.२९ रुपये बसते. मात्र प्रशासनाने ती ३२०० रुपये जाहीर केली. त्यामुळे गाळप होणार्‍या उसाला प्रतीटन ३२०० प्रमाणे देण्यात येणार असून गळीत हंगाम समाप्तीनंतर दोन टप्प्यात उर्वरीत रक्कम देण्यात येणार आहे. उस उत्पादक सभासदांनी कारखान्याला अधिकाधिक उस पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

यावेळी नुतन उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.