महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रचाराच्या रणधुमाळीने बिद्री कार्यक्षेत्र ढवळले; सभांमधून झडताहेत नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!

12:26 PM Dec 01, 2023 IST | Abhijeet Khandekar
Bidri Sugar Factory Election
Advertisement

नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी कार्यकर्त्यांत उर्जा

विजय पाटील सरवडे

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कायमच चुरशीची असते. चार तालुक्यांतील राजकारण आणि त्याद्वारे उमटणारे पडसाद यामुळे निवडणुकीची रंगत तर वाढतेच पण राजकीय समिकरणे देखील बदलतात. या कारखान्याच्या निवडणुकीत जिह्यातील मातब्बर नेते उतरल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही आघाड्या मातब्बर उमेदवार व नेतेमंडळीच्या पाठिंब्यामुळे भक्कम झाल्या आहेत. दोन्ही आघाडीतील नेतेमंडळीं विविध गावांतील सभांमधून एकमेकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Advertisement

नेत्यांच्या या आक्रमक भाषणांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून नेत्यांच्या या रंगतदार आरोप-प्रत्यारोपाने कार्यक्षेत्र ढवळून निघाले आहे. भविष्यातील राजकरणाची नांदी ठरणाऱ्या या निवडणुकीत नेत्यांची टोकाची ईर्षा आणि संघर्ष दिसत आहे. प्रचाराच्या विविध माध्यमांतून कारखाना कार्यक्षेत्रातील 218 गावे ढवळून निघाली आहेत. कागल, राधानगरी, भुदरगड आणि करवीर तालुक्याचे कार्यक्षेत्र तर 218 गावांचा समावेश असणारा बिद्री साखर कारखाना. या कारखान्याची तब्बल 55 हजारांवर मतदारसंख्या आहे. त्यामुळे एवढ्या भल्या मोठ्या मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठीची नेत्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच निवडणुकीचे मतदान काही दिवसावर आल्याने नेतेमंडळी सक्रीय झाली आहेत.

Advertisement

निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे आदी नेते सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारातून चांगला कारभार सभासदांसमोर मांडत आहेत. तर विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजे समरजिंतसिह घाटगे सत्ताधारींच्या कारभारावर टिकास्त्र सोडत आहेत.
दोन्ही आघाडीची रचना होताना अनेक नाट्यामय घडामोडी घडल्या. यामध्ये कारखान्याचे मुख्य घटक असणारे मेव्हुणे-पाहुणे एकमेकांच्या विरोधात श•t ठोकून उभे आहेत. तर एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे बिद्रीचा रणसंग्राम दिवसेंदिवस तापत आहे. यासाठी नेतेमंडळी अनेक धक्कातंत्राचा वापर करत आहेत. ज्या नेत्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्या नाराज गटांना आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ सुरु आहे. आपल्या गटातील नाराज विरोधी आघाडीच्या गळाला लागू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. नारांजाना पुढच्या निवडणुकीचे आश्वासन देऊन सक्रिय केले जात आहे.

महिलाही प्रथमच प्रचारात !
राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यातील 218 गावांतील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. सभा, पदयात्रा गाठीभेटी, स्पिकर गाड्या, सोशल मीडियाद्वारे प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. गावा-गावातील पै पाहुणे, मित्र, नातेवाईक सभासदांच्या दोन्ही आघाडीकडून भेटी घेतल्या जात आहेत. प्रचाराच्या गाड्या गाववार फिरू लागल्याने गावागावात प्रचाराचा धुरळा उडत आहे. प्रथमच या निवडणुकीत महिला देखील प्रचारात उतरल्या असून घरोघरी फिरून आघाडीची भूमिका विशद केली जात आहे.

अंदाजाची चौकशी
निवडणूक लागल्यापासून दिवसेंदिवस चुरस अधिक तीव्र होत आहे. विविध लोकांचे पाठींबे मिळवून आपली आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी नेते कार्यरत असून आता अधिक मतांच्या गावावर लक्ष केंद्रित केले जात आहे. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्याने तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, याचा अंदाज दोन्ही आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते घेत आहेत. ज्या गावात आपली आघाडी कमी आहे त्या ठिकाणी मतांची वाढ होण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक जवळ येईल तसे विविध पर्यायांचा वापर करून निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार व नेते सक्रिय झाले आहेत.

 

Advertisement
Tags :
Allegations accusationsBidri Sugar Factory Electionpropagandatarun bharat news
Next Article