बिद्री के.पीं.कडेच रहावा ही लोकभावना; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
बिद्रीच्या चाव्या के.पीं.च्याच हातात देणं म्हणजे 55 हजार शेतकरी कुटुंबांचे कल्याण ! कसबा वाळवे येथील प्रचार सभेला सभासदांचा जोरदार प्रतिसाद
कसबा वाळवे : वार्ताहर
बिद्री साखर कारखान्यामध्ये माजी आमदार के.पी.पाटील यांचे नेतृत्व शेतक्रयांच्या कल्याणाचे आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे बिद्री साखर कारखाना के.पीं.कडेच राहावा, ही आता लोकभावना झाली आहे. बिद्री साखर कारखान्याच्या चाव्या के. पीं. च्या हातात देणे म्हणजे 55 हजार शेतकरी कुटुंबांचे कल्याण आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
हेही वाचा >>> बिद्री कारखाना हा के.पीं.चा नव्हे तर सभासदांचा आहे हे 3 तारखेला दाखवून द्या : मंत्री चंद्रकांतदादा पाटील
कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथील जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील होते. शेतकरी सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी के.पीं.च योग्य पर्याय आहेत,असेही ते म्हणाले.
यावेळी चेअरमन के पी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,प्रकाश पाटील, रंगराव पाटील,तानाजी खोत यांची भाषणे झाली.सभेला अरुण डोंगळे,अंबरीश घाटगे, रणजीतसिंह पाटील, भैय्या माने, सुरेशराव सूर्यवंशी, महेश भोईटे,भगवान पाटील, दिलीप पाटील,शिवाजी फराकटे आदी उपस्थित होते. उमेदवार उमेश भोईटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नईम अत्तार यांनी आभार मानले.
वळवायला ते काय पाटाचे पाणी आहे काय?
मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले,ठआज विरोधकांचे प्रमुख प्रवत्ते असलेले मारूतराव जाधव गुरुजी- तळाशीकर हे सहा वर्षांपूर्वी सांगत होते कि, 120 कोटींचा को-जन प्रकल्प करून के.पी.पाटील बिद्रीचे पत्रेसुद्धा विकतील. आज तेच जाधव गुरुजी प्रचारात सांगत आहेत की, को-जन प्रकल्पातील 300 कोटींचा नफा दुसरीकडे वळविला आहे. एका बाजूला एवढा नफा झाला म्हणजेच कारखाना आणि प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे, हे ते मान्यही करतात. दुस्रया बाजूला नफा दुसरीकडे का वळवला असे म्हणतात. वळवायला ते काय पाटाचे पाणी आहे काय? असेही ते म्हणाले.