For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिद्री कारखाना हा के.पीं.चा नव्हे तर सभासदांचा आहे हे 3 तारखेला दाखवून द्या : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

03:31 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
बिद्री कारखाना हा के पीं चा नव्हे तर सभासदांचा आहे हे 3 तारखेला दाखवून द्या   मंत्री चंद्रकांतदादा पाटील
Advertisement

आणखी कोणी चेअरमन व्हावेत हे के.पीं.ना वाटतच नाही मंत्री चंद्रकांतदादा पाटील

गारगोटी प्रतिनिधी

Advertisement

कपबशी चिन्ह घेताना संघर्ष झाला परंतू कपबशी हे चिन्ह आम्हालाच मिळावे हे परमेश्वराची ईच्छा होती. सुदैवाने तेच घडले असून बिद्री कारखान्याच्या निवडूकीत परिर्वतन अटळ आहे. के.पी. हा माणूस स्वार्थासाठी गोड बोलतो मागच्या निवडणूकीवेळी आम्ही त्यांना पाठींबा दिला. आम्हाला वाटले ते कारखान्याचा कारभार चांगला करतील पण ती चूक झाली आता ही चुक दुरूस्त करण्याची वेळ आली असून बिद्री कारखाना के.पीं.चा नव्हे तर सभासदांचा आहे हे 3 तारखेला दाखवून द्या असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते मुदाळ (ता.भुदरगड) येथे राजर्षी शाहू परिर्वतन विकास आघाडीच्या बैठकी दरम्यान बोलत होते.

हेही वाचा >>> बिद्री के.पीं.कडेच रहावा ही लोकभावना; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

Advertisement

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले की, ताळेबंद आम्हाला ही कळतो, ताळेबंद चुकीचा असेल तर त्याची चौकशी ही होणार. मी बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी 3 दिवस ठाण मांडून बसणार आहे. कारखान्यावर आमचे लहानपणापासून प्रेम आहे. माझे गाव जवळच आहे. त्यामुळे इथे चांगला कारभार यावा ही माफक अपेक्षा होती पण तसे घडलेले नाही. के.पी.यांनी त्यांनी आपल्या अज्ञानाचा फायदा घेतला. माझा एक स्वभाव आहे की काम झालं ना की मी पुन्हा मागे वळून बघत नाही. मी तो कारखाना जिंकल्यानंतर सांगायला पाहिजे होते मी दर महिन्याला येऊन बसणार. ताळेबंद हा शब्द आपल्याला कळतो. या कारखान्याची उलाढाल साडेचारशे कोटी आहे. एका वर्षी प्रॉफिट आहे 3 लाख, दुस्रया वर्षी दोन लाख 14 हजार आहे.तुमच्या गावतील दुध डेअरीला देखील 5-10 लाखचा नफा होतो असे ते म्हणाले. तसेच 500 रुपये कमी किमतीने तुम्ही मोलॅसिस विक्री करून कारखान्याचे नुकसान केले, कमी किमतीने विक्री केलेले मोलॅसिस खाजगी कारखान्याच्या फायद्यासाठी विक्री केला असा सवाल त्यांनी केला.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, लै भारीची टिमकी वाजविण्राया के.पी.पाटील यांनी सभासदांच्या हितासाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या हे सांगावे. कारखान्याच्या लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर ते लेखापरिक्षण थांबावी यासाठी त्यांनी केवीलवाणी धडपड केली. कर नाही तर डर कशाला या उक्ती प्रमाणे त्यांनी लेखापरिक्षणाला सामोरे जाणे गरजेचे होते परंतू त्यांनी तसे न करता टेस्ट ऑडीटला स्थगिती मिळावी यासाठी चाललेली धडपड यातून समजते की कारखान्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. कारखान्यात केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठीच मंत्र्यांना सोबत घेवून प्रयत्न करत आहेत. परंतू आम्ही चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारी के.पी.पाटील यांचा भ्रष्टाचार उघड करून लै भारीची टिमकी बंद करणार असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार धनंजय महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, भाजपा नेते प्रविणसिंह सावंत, सुर्याजीराव देसाई, धैर्यशिल भोसले, आलखेश कांदळकर, तात्यासो पाटील, जयवंत पाटील, पंडीत पाटील, राजेंद्र पाटील, दत्तात्रय मांगोरे, संतराम पाटील, साताप्पा चव्हाण, वाय.के.पाटील, अशोक पाटील शिवाजी पाटील, हिंदूराव पाटील, नाना पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व सभासद उपस्थित होते.
चौकट : जावायाला फसविणारा माणूस कोणालाही फसवू शकतो.

हिंदू संस्कृतीमध्ये जावायाला विशेष महत्व असून जावायाला काहीतर देण्याची पध्दत हिंदू धर्मात आहे. ए.वाय. पाटील हे मुदाळ गावचे जावाई आहेत. परंतू के.पी. पाटील यांनी जावायाला गेली 30 ते 35 वर्षापासून फसविण्याचे काम केले आहे जो माणून जावायाला फसवितो तो कोणालाही फसवू शकतो असे मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले.

Advertisement
Tags :

.