महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिडेन यांचा पुत्र हंटर ठरला दोषी

06:38 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

25 वर्षांची शिक्षा शक्य : माहिती लपविल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी जो बिडेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे पुत्र हंटर बिडेन यांना गन प्रकरणी 7 दिवसांच्या सुनावणीनंतर दोषी ठरविण्यात आले आहे. डेलावेयरच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांच्या पुत्राला न्यायालयाने दोषी ठरविण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करताना हंटर यांनी स्वत:च्या अमली पदार्थांच्या व्यसनाची माहिती लपविल्याचा आरोप आहे.

हंटर यांना आत 120 दिवसांच्या आत शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच त्यांना 25 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. हंटर न्यायालयाकडून दोषी ठरल्यास त्याला कधीच माफ करणार नसल्याचे बिडेन यांनी फ्रान्स दौऱ्यावर असताना म्हटले होते.

हंटर यांना 3 प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले असून  यातील 2 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे तर तिसऱ्या प्रकरणी 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. फेडरल गाइडलाइन्सच्या शिफारसींनुसार शिक्षा कमी किंवा अधिक सुनावण्याचा निर्णय न्यायाधीशांवर अवलंबून आहे. हंटर विरोधात 120 दिवसांमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे. म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी शिक्षा ठोठावली जाणार आहे.

ऑक्टोबर 2018 मध्ये कोल्ट कोब्रा हँडगन खरेदी करताना माहिती लपविल्याचा आरोप हंटर बिडेनवर आहे. त्यावेळी हंटर हे अमली पदार्थांच्या आहारी गेले होते तसेच नियमित स्वरुपात अमली पदार्थांचे सेवन करत होते. अमेरिकेच्या कायद्यानुसार अमली पदार्थांचे सेवन करणारा व्यक्ती स्वत:कडे बंदुक किंवा एखादे घातक शस्त्र बाळगू शकत नाही.

पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने दिली साक्ष

हंटर यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी हेली यांनी न्यायालयात साक्ष दिली. हंटर यांच्या कारची तपासणी केली असता तेथे एक गन मिळाली होती. तसेच हंटर यांना अनेकदा अमली पदार्थांचे सेवन करताना पकडले होते असे हेली यांनी न्यायालयासमोर सांगितले.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article