महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायल पंतप्रधानांशी बायडेन यांची चर्चा

06:22 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नागरिकांचे संरक्षण सर्वात महत्वाचे असल्याचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

पश्चिम आशियातील गाझामध्ये 47 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेले युद्ध कतारच्या प्रभावी मध्यस्थी आणि हस्तक्षेपानंतर 24 नोव्हेंबरला काही दिवसांसाठी थांबला होता. मात्र, पुन्हा एकदा इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी गुऊवारी नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत गाझाच्या सर्वात मोठ्या शहरांभोवती प्रचंड शहरी संघर्षाच्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. बायडेन यांनी या संभाषणात नागरिकांचे संरक्षण करणे आणि नागरिकांना हमासपासून वेगळे करणे या गंभीर गरजेवर भर दिल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article