For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

16 खनिज गटांच्या खाण उत्खननासाठी बोली

06:53 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
16 खनिज गटांच्या खाण उत्खननासाठी बोली
Advertisement

टाटा स्टील, वेदांता यासारख्या मोठ्या कंपन्यांना संधी : जानेवारीत होणार लिलाव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

16 खनिज गटांच्या खाण लीजसाठी बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये बड्या भारतीय कंपन्याही जानेवारीत होणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांच्या लिलावात रस दाखवू शकतात. कंपन्या, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ञांच्या मते, आतापर्यंत टाटा स्टील, वेदांता आणि एनएमडीसी जानेवारीमध्ये होणाऱ्या लिलावाचे मूल्यांकन करतील आणि लिलावात संधी शोधतील. पहिल्या फेरीसाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी आहे. यामध्ये 16 खनिज खाण आणि चार खनिज गट आणि संमिश्र परवान्यासाठी बोली लावली जाणार आहे.

Advertisement

टाटा स्टीलच्या प्रवक्त्याला  खनिजांमध्ये स्वारस्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘आम्ही सरकारच्या प्रस्तावाचे मूल्यमापन करत आहोत. टाटा स्टीलने जुलैमध्ये आपला नैसर्गिक संसाधन विभाग सुरू केला आहे. कंपनी लिथियमसह बॅटरी खनिजांशी संबंधित विभागातील आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य संधींचा विचार करेल.

एका कायदेशीर सल्लागार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यामध्ये मोठ्या कंपन्या सहभागी होणार हे निश्चित आहे.

बॅटरीचे सुटे भाग बनवणाऱ्या अन्य एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शोध आणि खाणकामात काही दिग्गजांचा सहभाग असावा असा माझा अंदाज आहे. खाणकामाचा पूर्वीचा अनुभव असलेल्या मोठ्या कंपन्यांसाठी हे अधिक योग्य असेल’.

या अपेक्षांच्या अनुषंगाने, खाण क्षेत्रातील दिग्गज वेदांतने सांगितले की ते भारतातील खाण संधींचा शोध घेईल. वेदांत समूहाचे प्रवत्ते म्हणाले, ‘वेदांतला नेहमीच संधी शोधण्यात रस आहे. महत्त्वाच्या खनिजांच्या उत्खनन आणि उत्खननाच्या लिलावात समान सहभाग असेल.

हिंडाल्को कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पै यांनीही कंपनी  ज्या भागात आपले वास्तव्य करुन आहे तेथे संधींचा शोध घेत असते.

Advertisement
Tags :

.